Friday, January 8, 2010

अाई फिशिंग

राधा ला बालजगतच्या स्वच्छंद या बालक मंदीरात घातले होते.

मी तिला रोज बालजगत ला सोडायला अाणी अाणायला जायचे.

एक दिवस मी तिला अाणायला गेले असतांना राधा धावत धावतच अोरडत माझ्या जवळ अाली,

ती अोरडत होती, "अाई फिशिंग,अाई फिशिंग"

ती काय म्हणते अाहे हे माला कळेचना,

मी अापल साहज विचारल ,” फिशिंग",

त्या वेळेस राधाचे भाव असे होते, काय अाई, अशि काशी ग तु,एवढे पण तुला कळत नाही, कित्ती सोप्प अाहे ते,

अाणी , हातात संपलेला डब्बा घेउन ती ,अाई फिशिंग ,असे अोरडली.

तीच्या दीदींना विचारल्यावर सगळा प्रकार माझ्या लक्शात अाला.

अाज शाळेत मुलांना फिनिश (finish) या नवीन शब्दाचा प्रयोग शिकवला होता.

त्याचाच हा परीणाम होता, अाणी हा फिशिंग शब्द कुठुन अाला ते पण लक्षात अाल माझ्या.

राधा अाणी तीची ताई मोहिनी ,घरी फिशपॉट अाहे त्या मुळे , फिशिंग राॅड बानवुन त्याने फिशिंग फिशिंग खेळतात.

अाणी ताई हा शब्द वारंवार वापरते त्यामुळे हिला पण माहीती अाहे, शिवाय दीदी ने "फि" शब्दा पासुन सुरु होणारा कुठला तरी शब्द वापरला होता ,

त्या मुळे तो हाच शब्द अाहे हे गृहित धरुन राधाने हा शब्द वापराला.






Thursday, January 7, 2010

नमस्कार मंडळी

मला दोन मुली अाहेत, मोठी मोहिनी अाणी लहानी राधा. मुली बोलायला लागल्या पासुन रोज ज्या गंमती जमती त्यांच्या बोलण्यामुळे घडल्या त्याच इथे लिहीण्याचा प्रयत्न करते अाहे. तर चला मग अापण सगळे याचा अानंद घेउ. मोहिनी अडीच वर्षाची होती. एकदा मोहिनीचा मामा अाला होता. मामा अाला की त्याच्या बरोबर खेळायचे हा मोहिनीचा नेहेमीचा कार्यक्रम. या वेळेस मात्र मामाला काही महत्वाचे माझ्याशी बोलायचे होते. त्यामुळे तो नेहेमी प्रमाणे तिच्याशी न बोलता सरळ माझ्या कडे अाला. मोहिनीला काही हे पटल नाही, तिची लुडबुड चालु होती. मोहिनीला काही तरी कामात अडकवायचे या विचाराने तिला मी एक कागद अाणी पेनसिल दीली. नुकतीच इंग्रजी अक्षरांची अोळख झाली होती. त्यामुळे सारखी तादद-पेंसिल दे तादद-पेंसिल (तेव्हा तीला 'क' अाणि 'ग'नव्हत म्हणता येत) म्हणून मागे लागायची. कागद पेंसिल मिळणार हे कळल्यावर मोहिनी चे भाव असे होते जशी ती जगातिल सर्वात अानंदी व्यक्ती अाहे असे होते. तिला म्हणटल मामा ला ए टु झेड पर्यंत लीहुन दाखव. तीला कामात गुंतवुन अाम्ही निश्चिंत की अाता निदान १५मि. , तरी अाम्हाला शांत बोलाता येइल.पण कुठले काय, ही बया लगेच हजर , म्हणाली अाई हे घे झाल माझ लिहुन ए २ झेड . अाम्ही दोघे चाट तिने काय लिहीले अाहे पाहिल्यावर,तीने चक्क इंग्रजी अक्षर 'ए' अाकाडा "२ ” इंग्रजी अक्षर 'z” (A२Z) लिहीले होते. अाम्हाला काय म्हणाव हिच्या हजरजवाबी पणाला हेच कळेना. अाम्ही दोघे कौतुकाने मोहिनी काडे पाहत राहिलो.